पुणे विभाग शिक्षक विधानपरिषद निवडणूक

शिक्षकांचा 'शिक्षक' प्रतिनिधी विधिमंडळात!

संविधान सभेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेला विचार — शिक्षकांचा आमदार 'शिक्षकच' असावा. आज तो विचार प्रत्यक्षात आणण्याची वेळ!

माझी भूमिका

जुनी पेन्शन योजना
लागू करणार!

1 नोव्हेंबर 2005 पूर्वी रुजू झालेल्या शिक्षकांना जुन्या पेन्शन योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी शर्थीने प्रयत्न करणार.

अशैक्षणिक कामांपासून मुक्ती

शिक्षकांना दिलासा
अशैक्षणिक कामातून सुटका!

निवडणूक, जनगणना, सर्वेक्षण यांसारख्या अशैक्षणिक कामांमधून शिक्षकांची कायमची मुक्तता करणार.

एकत्र येऊयात

आपल्या प्रलंबित प्रश्नांना
न्याय देण्याची वेळ!

पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर — पाचही जिल्ह्यांतील प्रत्येक शिक्षकाचा स्वाभिमान, हक्क आणि भविष्य यासाठी लढा!

प्रा. सचिन सानप
प्रा. सचिन नवनाथ सानप

शिक्षकांचा सहकारी

सहा. प्राध्यापक, राज्यशास्त्र विभाग | नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे

राज्यशास्त्र विषयाचा प्राध्यापक, मॉडर्न एज्युकेशन सोसायटीचा विश्वस्त, आणि सध्या मा. मंत्री, उद्योग व मराठी भाषा, महाराष्ट्र राज्य यांच्याकडे विशेष कार्य अधिकारी (OSD). वर्गखोलीतील वास्तव आणि प्रशासकीय व्यवस्थेची सखोल जाण — या दोन्हींचा समन्वय.

🎓 Ph.D. (Pursuing), SET, M.A. (Pol. Science)
🏛️ विश्वस्त, मॉडर्न एज्युकेशन सोसायटी
⚖️ विशेष कार्य अधिकारी, मा.मंत्री, उद्योग व मराठी भाषा
12
अनुकंपा नियुक्त्या
(राज्यात सर्वाधिक)
10+
वर्षे एकलव्य
संस्थेचे कार्य
3
महाविद्यालयांना
स्वायत्त दर्जा
5
जिल्ह्यांचा
मतदारसंघ

व्हिडिओ संदेश

माझा थेट संवाद — तुमच्याशी

माझा संकल्प

शिक्षकांच्या हक्कांसाठी ठोस भूमिका — प्रत्येक मुद्दा कृतीत रूपांतरित करण्याची हमी

1

जुनी पेन्शन योजना (OPS) लागू करणार

1 नोव्हेंबर 2005 पूर्वी रुजू झालेल्या शिक्षकांना जुन्या पेन्शनचा लाभ मिळवून देण्यासाठी शर्थीने प्रयत्न करणार व प्रसंगी न्यायालयीन लढाई लढणार.

2

कालबद्ध पूर्ण अनुदानाचा हक्क

"टप्प्याची प्रतीक्षा नव्हे — कालबद्ध पूर्ण अनुदानाचा हक्क!" अंशतः अनुदानित शिक्षकांना आर्थिक स्थैर्य मिळवून देणार.

3

समान काम — समान सेवा हक्क

तंत्रशिक्षण, वैद्यकीय शिक्षण, अभियांत्रिकी शिक्षण क्षेत्रातील प्रत्येक पात्र शिक्षकांच्या सेवा व आर्थिक हक्कांचे संरक्षण करणार.

4

वेतन विलंब थांबवणार

दर महिन्याच्या 1 तारखेला वेतन मिळण्यासाठी शासन निर्णय निर्गमित करण्यासाठी प्रयत्न करणार. थकीत वेतन देयके तातडीने अदा करणार.

5

अशैक्षणिक कामातून मुक्तता

निवडणूक, जनगणना, सर्वेक्षण इत्यादी अशैक्षणिक कामांमधून शिक्षकांची कायमची मुक्तता करण्यासाठी प्रयत्नशील राहणार.

6

शिक्षकांचा कार्यभार

जोपर्यंत कार्यभार शून्य होत नाही तोपर्यंत शिक्षकांना अतिरिक्त (Surplus) घोषित करू देणार नाही.

7

संच मान्यता व तासिका

विज्ञान प्रात्यक्षिक बॅच 20 आणि 45 मिनिटांच्या तासिका ग्राह्य धरूनच संच मान्यता कायम राहण्यासाठी प्रयत्नशील राहणार.

8

माध्यम स्वातंत्र्य

सर्व अनुदानित शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार इंग्रजी किंवा मराठी माध्यम स्वीकारण्याची सोय करणार.

9

कॅशलेस आरोग्य विमा

सर्व अध्यापक व शिक्षकांना कॅशलेस आरोग्य विमा सुविधा लागू करणार.

10

निवृत्ती वय 60 वर्षे

वरिष्ठ महाविद्यालयांप्रमाणे सर्व शिक्षकांचे निवृत्ती वय 58 वरून 60 वर्षे करण्याचा पाठपुरावा करणार.

11

पदभरती प्रक्रिया गतिमान

अकृषी विद्यापीठे व वरिष्ठ महाविद्यालयांतील पदभरती पारदर्शक करणार. रिक्त पदे तातडीने भरणार.

12

शिक्षण सेवकांना पूर्ण संरक्षण

शिक्षण सेवक योजना बंद करून विद्यमान शिक्षण सेवकांना तातडीने पूर्ण सेवा संरक्षण देणार.

आपला पाठिंबा द्या!

शिक्षकांचा आवाज विधिमंडळात पोहोचवण्यासाठी आजच संपर्क साधा

कार्यालय: जानकी इमारत, बीएसएनएल कार्यालयाच्या समोर, मॉडेल कॉलनी, शिवाजीनगर, पुणे- ०४

मतदारसंघ: पुणे • सातारा • सांगली • सोलापूर • कोल्हापूर